vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- कडधान्य पिकांच्या मुल्यवर्धनास चालन देऊन शेकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणे या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था FPO क्लस्टर स्तर महासंघ CLF प्राथमिक कृषी पतसंस्था PACS उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती/संस्था यांना सहाय्यक देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश असून याकरिता इच्छूकांनी कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करिता अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.योजना- कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, बाब/घटक प्रक्रिया युनिट, पीक कडधान्य, अनुदान दर प्रकल्प खर्चाच्या 33 % किंवा जास्तीत जास्त रु. 25 लाख प्रति युनिट यापैकी जे कमी असेल ते.

पात्र लाभार्थी घटक-योजनेंतर्गत खालील घटकांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल, शेतकरी उत्पादक संस्थ (FPOs), क्लस्टर स्तर महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), वैयक्तिक अर्जदार, कोणत्याही अधिनियमांतर्गत नोंदणीकृत इतर उपक्रम

पात्रता निकष – गट लाभार्थी-संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी. प्रकल्प खर्चाच किमान 15 टक्के रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वत: उभारण्याची आर्थिक क्षमता असावी.

वैयक्तिक लाभार्थी-अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे. एका कुटुंबातील (स्वत: पती/पत्नी व अविवाहित मुले) केवळ एका व्यक्तीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या किमान 15 टक्के रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वत: उभारण्याची आर्थिक क्षमता असावी, अनुसूचित जाती/जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी जिल्हे यांना प्राधान्य असेल

अर्थसहाय्य प्रमाण-आर्थिक सहाय्य – प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल रु. 25.00 लाख प्रति युनिट (यापैकी जे कमी असेल ते) अनुदान केवळ यंत्र सामग्री खरेदी तसेच इमारत/गोदाम/ साठवण पायाभूत बांधकामासाठी दिले जाईल. जमीन वीज मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देय राहणार नाही. तसेच इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल.

000000

संबंधित पोस्ट

मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी*एप्रिल महिन्यात एसआयआर मोहिम

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 29 मार्चला होणार भव्य सत्कार*

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

जागतिक वारसा स्थळा’च्या यादीत कातळशिल्पांचा समावेशासाठी रोडमॅप तयार करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश