vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

विकसित भारत प्रश्नमंजुषा;‘MY Bharat’ पोर्टलवर अर्ज मागविले 

विकसित भारत प्रश्नमंजुषा;‘MY Bharat’ पोर्टलवर अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद उपक्रमांतर्गत ‘विकसित भारत प्रश्नमंजुषा’ आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेत पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल यांनी केले आहे.

या स्पर्धेत १५ ते २९ या वयोगटातील युवकांना ‘MY Bharat’या पोर्टलवरुन सहभागी होता येणार आहे. त्यासाठी दि.३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक मंडळे, युवा स्वयंसेवक तसेच पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल यांनी केले आहे

  ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’साठी युवकांची निवड विविध टप्प्यांतून करण्यात येणार आहे. प्रथम टप्पा विकसित भारत प्रश्नमंजुषा, दुसरा टप्पा निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धा, राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय युवा नेतृत्व संवाद आणि तिसरा टप्पा राष्ट्रीय स्तरावरील युवा नेतृत्व संवाद याप्रमाणे आहे

जिल्हास्तरीय स्पर्धा १० नोव्हेंबरपासून,जिल्हास्तरीय स्पर्धा दि. १० ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत, तर राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय VBYLD दि. १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.

या निवड प्रक्रियेत उत्कृष्ट ठरणाऱ्या युवकांना दि. १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

प्रसार भारतीने सांस्कृतिक प्रसार वाढवण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी प्रसारण साहित्य पुनर्प्रकाशनाचा मसुदा तयार केला आहे

vishwatmaklokswamivarta

रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्याची गुरूकिल्ली- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्नाची गरज

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील टॉप डिजिटल पोस्टर बॅनर तयार करणाऱ्या एस.एस.पी.क्रिएशन च्या  तृतीय वर्षात वाटचाल…

vishwatmaklokswamivarta

एनकेएसपीटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगतर्फे ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल रिचार्जसाठी नवीन नियम लागू केले आहेत

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न