vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद· सहा विभागांना याच महिन्यात भेटी विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद· सहा विभागांना याच महिन्यात भेटी विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

बुलढाणा, ) प्रतिनिधी: राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.

या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.*टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक*

पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर

ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६

स्थळ : अमरावतीई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगरई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबईई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.

भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

0000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद कामकाज :राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी- उद्योग मंत्री उदय सामंत

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे – पणन मंत्री जयकुमार रावल “मॅग्नेट“ची १८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta