vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

नागपूर, प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वर्धमान नगर परिसरात अत्याधुनिक सुविधा असलेल्या मल्टीस्पेशालिटी न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार अजय संचेती, विजय दर्डा, आमदार कृष्णा खोपडे, चैनसुख संचेती, न्यू एरा हॉस्पिटलचे प्रमुख आनंद संचेती, उज्वल पगारिया, डॉ. निलेश अग्रवाल, हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंटच्या प्रियंका सावंत, विधिरा मिश्रा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. मेडिकल केअरमध्ये राज्यासह देशात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेडिकल टुरिझमला चालना मिळत आहे. अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे विविध देश आरोग्य सुविधेसाठी भारताला प्राधान्य देत आहेत.

राज्यात अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासोबतच सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा पद्धतीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दोन हजार ४०० आजारांचा जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. न्यू एरा हॉस्पिटलमध्ये अत्यंत दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

संचालक डॉ. आनंद संचेती यांनी स्वागत करून प्रास्ताविकात न्यू एरा रुग्णालयात उपलब्ध सुविधांची माहिती दिली. या रुग्णालयात ३०० बेडची सुविधा असून एआय डिजिटल मेमोग्राफी, तत्काळ एमआरआय करण्याची सुविधा यामुळे कर्करुग्णांना दिलासा मिळणार आहे. या संस्थेतर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून भविष्यात रुग्णसेवेसाठी विविध प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. आभार निलेश अग्रवाल यांनी मानले.

 

०००००

संबंधित पोस्ट

कोरेगाव येथे 6 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

शिक्षणमत्री धर्मेद्र प्रधान याच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग याच्या उपोषणाला खोरिपाचा पाठिंबा-

मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर विविध उपाययोजना व सवलती लागू

vishwatmaklokswamivarta

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्ये देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग- ७ ची पणजी वार्षिक परिषद