vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर विधान परिषदेच्या कामकाजाबाबत केली सविस्तर चर्चा

विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर-विधान परिषदेच्या कामकाजाबाबत केली सविस्तर चर्चा

मुंबई, प्रतिनिधी : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटकच्या विधान भवनाला भेट दिली.

कर्नाटक राज्याच्या विधान परिषद कामकाजनिमित्त आयोजित या अभ्यास दौऱ्यात उपसभापती सचिन अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहेमद आणि उपसभापती उमाश्री यांची सदिच्छा भेट घेतली. या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी कर्नाटक विधान परिषदेच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेत विविध विषयांवर चर्चा केली.महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या विधिमंडळ कामकाजासाठी ‘डॅशबोर्ड प्रणाली’ यशस्वीपणे राबवली जात आहे. याच धर्तीवर अशीच आधुनिक डॅशबोर्ड प्रणाली कर्नाटक सरकारनेही आपल्या राज्यात लागू करावी, अशी संकल्पना उपसभापती सचिन अहिर यांनी मांडली. त्यावर कर्नाटक शासनाकडून या प्रस्तावाचा अत्यंत सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच, सलोख्याचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपसभापती सचिन अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांना महाराष्ट्र विधान भवनाला भेट देण्याचे अधिकृत निमंत्रणही दिले.

कर्नाटक दौऱ्यात उपसभापती सचिन अहिर यांनी कर्नाटक राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यू. टी. खादर यांचीही सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम व जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या अभ्यास दौऱ्यावेळी उपसभापती सचिन अहिर यांच्यासोबत महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे सचिव ३ डॉ. विलास आठवले उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन होणार साजरा

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत सोमवारी नशामुक्ती निर्धार पदयात्रा- ⁠नशामुक्त सांगलीच्या दिशेने सामूहिक पाऊल- अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली उपक्रम⁠- कल्पद्रुम मैदानावर सकाळी 8.30 वाजता उपस्थितीचे आवाहन

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरीकांच्‍या मदतीसाठी हेल्‍पलाईन