vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ३६ हजार ६८७ मतदारांपैकी २१ हजार ९४२ मतदारांचा सहभाग

नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान-३६ हजार ६८७ मतदारांपैकी २१ हजार ९४२ मतदारांचा सहभाग..

नांदेड, प्रतिनिधी : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील सर्व १२० मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात अंदाजे ५९.८१ टक्के मतदानाची नोंद झाली.

जिल्ह्यात सकाळी ८ ते १० या वेळेत ७.५४ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत २१.२० टक्के, तर दुपारी २ वाजेपर्यंत ३७.४३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढत सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५९.८१ टक्क्यांवर पोहोचला. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडली.जिल्ह्यातील मतदारयादीत एकूण ३६ हजार ६८७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी २१ हजार ९४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २८ हजार ६९४ पुरुष मतदारांपैकी १८ हजार १८० पुरुषांनी, तर ७ हजार ९९० महिला मतदारांपैकी ३ हजार ७६१ महिलांनी मतदान केले. तसेच, तीन इतर मतदारांपैकी एका मतदाराने मतदान केले. महिला मतदारांच्या तुलनेत पुरुष मतदारांचा सहभाग अधिक राहिला.जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकाळी प्रतिभा निकेतन महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि यशवंत महाविद्यालय येथील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या आणि निवडणुकीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

००००

 

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नाविन्यपूर्ण प्रसिद्धीवर भर द्या; नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे पुत्र अभिनेते टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातल्या अटक करण्यात आलेल्या तिघांना राजस्थान मधील कोटा येथून मुंबईत आण्यात आले आहे

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा-भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण..