vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण..

नांदेड, प्रतिनिधी : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” चे आयोजन तरोडा बु. मंडळातील पासदगाव येथे राधेश्वरी मंगल कार्यालयात करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती घेऊन लाभ मिळविला.

सदर शिबिरास नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी श्री. चातरमल , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातील विविध गावांचे सरपंच व इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महसुली कामे तात्काळ मार्गी लागत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, विशेष सहाय्य, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक, निवडणूक विभाग तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरामध्ये सातबारा व 8-अ चे एकूण 748 दाखले वितरित करण्यात आले. तसेच उत्पन्न, रहिवासी, वय, जातीचे तसेच अल्पभूधारक प्रमाणपत्र आदी मिळून एकूण 799 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या गट अदलाबदलीद्वारे सातबाराचे वितरण करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय SIR मोहिमेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरामध्ये विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. विशेषतः सातबारा व ८-अ वितरण, आधार दुरुस्ती, आपले सरकार सेवा केंद्र, जनगणनेतील स्व-गणना, आरोग्य तपासणी, वन विभाग, संजय गांधी निराधार योजना आदी स्टॉलना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विविध योजनांची माहिती घेऊन तत्काळ अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, सुनील माचेवाड, श्री. गरड तसेच मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, अनिरुद्ध जोधळे, कुणाल जगताप, प्रमोद बडवणे, सय्यद मोसीन, संतोष आस्कुलकर, श्रीकृष्ण येलमट्टे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी गोपीनाथ कल्याणकर, मारोती कदम, संजय आढाव, अविनाश करंदीकर, माधव शिराळे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी परिश्रम घेतले.

०००००

संबंधित पोस्ट

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही.

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

जिल्ह्यामध्ये दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने