vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवेआगर येथे सुसज्ज ॲक्वेरियम उभारणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

दिवेआगर येथे सुसज्ज ॲक्वेरियम उभारणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

          राज्य प्रतिनिधी-  मुंबई: रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटकांच्या आकर्षणात भर घालण्यासाठी अत्याधुनिक व सुसज्ज ॲक्वेरियम उभारण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी तातडीने शासनाकडे सादर करावा, असे र्निदेश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले.‍

    मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिवेआगर परिसरातील पर्यटन विकासासंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.ॲक्वेरियम प्रकल्पाबाबतचा सविस्तर आराखडा तयार करून तो तातडीने शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. तसेच प्रकल्पाचे नियोजन करताना पर्यटकांच्या गरजा, स्थानिक पर्यटनाला चालना आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्याचे र्निदेशही त्यांनी दिले. दिवेआगरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे र्निदेशही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेबैठकीस रायगड जिल्हा नियोजन अधिकारी, पर्यटन संचालनालयाचे संचालक, कार्यकारी अभियंता तसेच पर्यटन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली

यावेळी दिवेआगरचा सागरी किनारा हा राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक असून, वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देत असल्याचे नमूद करण्यात आले. पर्यटकांना अधिक दर्जेदार व नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिवेआगर येथे आधुनिक व सुसज्ज ॲक्वेरियम उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

इमाव, विमाप्र,विजा,भज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश 

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर व्यापक उपक्रम….

vishwatmaklokswamivarta

डीजे’मुक्त, सुरक्षित,पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीसर्व घटकांनी समन्वय राखावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी गणेश मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट मंडळांना तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta