vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

घोडबंदर भूखंड टीडीआर घोटाळा: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोर्टात माघार-हा निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही; आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार* माघार घेणाऱ्यांची चौकशीही करणार कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांचा घणाघात…

घोडबंदर भूखंड टीडीआर घोटाळा: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोर्टात माघार-हा निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही; आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार* माघार घेणाऱ्यांची चौकशीही करणार कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांचा घणाघात…

ठाणे प्रतिनिधी: घोडबंदर रोडवरील मानपाडा टिकुजीनीवाडी परिसरातील शंभर एकरहुनही अधिक जमिनीचा टीडीआर घोटाळा ठाण्यात भलताच गाजला होता. त्यावर राष्ट्रवादी पक्षाने ज्वलंत आंदोलन पुकारले, हायकोर्टात याचिका देखील दाखल केली. काळांतराने हा विषय मॅनेज झाल्यासारखा थांबला आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष गटाच्या महत्त्वाच्या याचिकाकर्त्या कोर्टातून माघार घेतली. त्याची सध्या राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू असून अप्रत्यक्षपणे पक्षाच्याच कार्यप्रणाली वरती संशयाचा धूर निर्माण झाला आहे. ही गोष्ट प्रामाणिक पक्ष कार्यकर्त्यासाठी लाजिरवाणी असून, हा निर्णय माघार घेणाऱ्यांचा वैयक्तिक असून पक्षपातळीवरती असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचा दावा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केला आहे. त्मात्र चांगलीच चपराक बसली आहे.

   गेली दोन वर्ष रणझुंजार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये आंदोलनांचा विक्रम होत आहे. त्यांच्या कुठल्याच आंदोलनावरती कधीच संशय निर्माण झाला नाही. उभ्या महाराष्ट्राने त्यांना आंदोलनाचा बादशाह म्हणून गौरवले. त्याच ठाण्यात पक्षाच्या कार्यकारणीला, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशी कोणी माघार घेतली असेल तर पक्षाच्या बैठकीत त्याचा समाचार घेतला जाईल, जाब विचारला जाईल आणि माघार घेणाऱ्या नगरसेवकांच्या चौकशीची मागणी केली जाईल, असा दावाही प्रकाश पाटलांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. या दाव्यामुळे राष्ट्रवादीची गाजलेली आणि नंतर थंडगार पडलेल्या मेंटल हॉस्पिटल, येऊर क्षेत्र घोटाळा, टिकुजीनी वाडी प्रकरण, कापूरबावडी येथील फिनिक्स मॉल, अंतर्गत मेट्रो रेल्वे मार्ग, अमेझॉन बाळकुम प्रकल्प अशा अनेक आंदोलनाच्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संशयाचा धूर निर्माण झाला आहे. अशा पद्धतीचे धोरणात्मक निर्णय आंदोलनातून माघारी घेण्याचे निर्णय हे एकट्या दुकट्या कुठल्या नेत्याच्या मर्जीचे नसतात, ते एवढ्या मोठ्या पक्षाच्या कार्यकारणीमध्ये ठरत असतात. त्यावर व्यापक सहमती घेतलेली नाही ही माघार ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नव्हती. त्यावर पक्षाच्या चरित्राचा प्रश्न होता. असे असताना पक्षातील इतर निष्ठावंतांना, कार्यकर्त्यांना न विचारता ही माघार कशी काय घेतली गेली, ती चुकीची असून त्यावर चौकशीची मागणी आम्ही करू, असे देखील प्रकाश पाटलांनी नमूद केले आहे. भविष्यात यावरून राष्ट्रवादीची डझनावरची आंदोलन वादग्रस्त ठरतील असे दिसते.

 

संबंधित पोस्ट

अनुसूचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तहसीलस्तरावरच मिळणार MPSC-UPSC चे मार्गदर्शन ‘महाज्योती’ आणि ‘अमृत’च्या संयुक्त पुढाकाराने बुलढाण्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन 

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या – जिल्हाधिकारी सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

नागपूर जिल्ह्यातील #राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यातील ७२१ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध आतापर्यंत ११ हजार १४५ शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर; पात्र शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजनप्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व गतीने मार्गी लावावीत- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

vishwatmaklokswamivarta

उच्च व तंत्र शिक्षणात एकल पाल्य योजना’ राबवण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील