कुणबी समाजोन्नती संघाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका खेड यांच्या वतीने ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६’ उत्साहात संपन्न झाला. भांडुप पश्चिम येथील सह्याद्री स्कूलमध्ये आयोजित या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष शंकर बाईत, उपाध्यक्ष प्रकाश गोटल, उदय कठे, जयवंत वामने, उप सेक्रेटरी रुपेश तांबट, संजय जाधव, कार्यकारणी सदस्य,नवनीत पिंपरे, मंगेश मांडवकर, राजाराम निकम, विलास कावणकर, युवा अध्यक्ष प्रवीण शिबे, युवा सेक्रेटरी अँड कल्पेश बांद्रे , युवा खजिनदार शैलेश शिगवण, उपाध्यक्ष गणेश झुजम, उपसेक्रेटरी शिरीष कदम, रोहित भाईजे, तसेच समाज बांधव, विद्यार्थी, पालक वर्ग उपास्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना शाखाध्यक्ष शंकर बाईत म्हणाले की, समाजाच्या प्रगतीत आणि उन्नतीत विद्यार्थी व युवा पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष उदय कठे यांनी म्हणाले की, विद्यार्थी आणि तरुण पिढी हा समाजाच्या प्रगतीचा खरा पाया आहे. गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना नितीन खापरे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत उपलब्ध करून देऊ. कुणबी समाजोन्नती संघाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शासकीय सेवांमध्ये कुणबी समाजातील तरुणांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.नवनीत पिंपरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा सचिव संदीप दोडेकर यांनी केले, तर उपाध्यक्ष प्रकाश गोठल यांनी आभार मानले.