vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड 20 26 हा प्रजा फाउंडेशन चा अहवाल प्रकाशित.मुंबईतील काँग्रेसचे तीन आमदार उत्तम कामगिरी’ परंतु अन्य आमदारांचे काय?

मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड 20 26 हा प्रजा फाउंडेशन चा अहवाल प्रकाशित.मुंबईतील काँग्रेसचे तीन आमदार उत्तम कामगिरी’ परंतु अन्य आमदारांचे काय?

मुंबई प्रतिनिधी-

प्रजा फाउंडेशनने आज मुंबईतील आमदाराचे रिपोर्ट कार्ड 20 26 हा अहवाल प्रकाशित, सदर अहवालामध्ये मुंबईतील काँग्रेस पक्षाचे आमदार यांचे मूल्यमापन दिसून येत आहे

तर शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे यांचे  उभाठा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासह भाजपा पक्षाचे आमदाराचे विश्लेषण प्रजा फाउंडेशन या मुंबईतील आमदाराच्या रिपोर्ट कार्ड मधून असे निदर्शनास येत नाही, आमदारांचा विधानसभेतील कामकाजातील सहभाग आणि त्यांनी विचारलेले प्रश्न त्या प्रश्नाची गुणवत्ता त्यांची उपस्थिती आणि विधिमंडळातील कामगिरी संबंधित इतर बाबी अशा विविध घटकांचा मूल्यमापन करण्यात आले असल्याचे या रिपोर्ट मधून तरी समोर येत नाही प्रजा फाउंडेशन ने मुंबईतील प्रेस क्लब मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये इतर आमदारांचा उल्लेख दिसून येत नसल्याचे त्यांच्या प्रेस नोट मधूनही लक्षात येत आहे मुंबईतील इतर आमदाराचे मूल्यमापन यातून समोर येत नाही परंतु काँग्रेसच्या तीन आमदारांची कामगिरी या रिपोर्ट कार्ड मधून दिसून येत आहे.

प्रजा फाउंडेशनने आज मुंबईतील आमदाराचे रिपोर्ट कार्ड 20 26 हा अहवाल प्रकाशित केला आहे महाराष्ट्र विधानसभेत मुंबईतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 20 25 या कालावधीतील कामगिरीची वस्तुनिष्ठ आणि उपलब्ध पुराव्यावर आधारित मूल्यमापन करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे यावेळच्या रिपोर्ट कार्ड मधील पहिल्या तीन क्रमांकावरील आमदार पुढील प्रमाणे आहेत काँग्रेसचे आमदार अमिन पटेल( श्रेणी -1= गुण82.89)काँग्रेसचे आमदार असलम शेख( श्रेणी-2- गुण-80-58), आणि काँग्रेसचे आमदार ज्योती गायकवाड श्रेणी-3 गुन-80.30) सर्वाधिक उत्तम कामगिरी करणाऱ्या तीन आमदारांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत अधिक चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते नागरिकांचे प्रश्न मांडणे सभागृहात प्रश्न विचारणे विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणे आणि सभागृहातील उपस्थित ती कायम ठेवणे अशा सर्वच निष्कर्षावर त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे

रिपोर्ट कार्ड चे निष्कर्ष अधिक स्पष्ट करताना प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद मस्के म्हणाले की आमदाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विधानसभेच्या सभागृहात पोहोचत आहेत का?हा सर्वात मूलभूत मुद्दा कामगिरीचा विचार करताना आम्ही लक्षात घेतला आहे.

यानुसार काही आमदाराने विधानसभेमध्ये प्रभावीपणे प्रतिनिधित्व करत चर्चा मध्ये सक्रिय योगदान देत असल्याचे दिसते. तसेच आमदाराच्या कामगिरीतील काही महत्त्वाच्या उणिवा लक्षात येतात. पंधराव्या विधानसभेच्या तुलनेत आमदारांच्या सरासरी गुणांमध्ये घट झालेली आहे बाराव्या विधानसभेच्या रिपोर्ट काळात आमदाराचे सरासरी गुण 61 होते ते चौदाव्या विधानसभेत 54 पर्यंत घसरले आणि पंधराव्या विधानसभेत किंचित वाढून 55 झाले आहेत या आकडेवारीकडे केवळ क्रमांकातले चढउतार म्हणून पाहून चालणार नाही, आमदारांच्या कामगिरीचे मोजमाप त्यातून होत आहे.नागरिक लोकप्रतिनिधी वर जी जबाबदारी सोपवितात ती पार पाडण्याच्या कार्यक्षमतेत झालेली गट या आकडेवारीतून लक्षात येते

निष्कर्षाचे विश्लेषण करत प्रजा फाउंडेशनचे व्यवस्थापक असिफ खान म्हणाले की नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आणि त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजेत, विचारले पाहिजे त्यावर चर्चा केली पाहिजे ही लोकप्रतिनिधी कडून आपली अपेक्षा आहे. सभागृहाचे कामकाज चालू असताना त्या वेळेचा प्रभावी वापर केला गेला पाहिजे आमच्याकडे वारीनुसार पंधराव्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन 20 24 ते पावसाळी अधिवेशन 20 25,(2,213) प्रश्न विचारण्यात आले.

12 व्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशन 2009 ते पावसाळी अधिवेशन 20 10(7,955) प्रश्नाच्या तुलनेत ही संख्या 72 टक्के कमी झाली. यावरून लक्षात येते की प्रश्नांची संख्या कमी होते चर्चेसाठी उपलब्ध दिवस कमी होत आहेत आणि प्रश्नाची गुणवत्ता ही घसरते म्हणजे नागरिकांचे प्रश्न सरकार समोर मांडण्याचा व त्यावर विचार विनिमय करण्याचा निर्णय घेण्याचा एक संविधानिक मार्ग तितक्या ताकदीने वापरला जात नाही हे स्पष्ट आहे महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वेळी हा अहवाल समोर येत आहे 15 व्या महाराष्ट्र विधिमंडळातील मुंबईतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नागरिकांच्या दृष्टिकोनातून कितपत सक्रिय आहेत विधानसभेच्या प्रभावी वापर नागरिकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यापासून त्यांची उत्तरे सरकारकडून मिळवण्यापर्यंत जबाबदारी किती ताकदीने पार पाडता आहेत या मुद्द्यावर या अहवालातून प्रकाश टाकला आहे

लोकप्रतिनिधी लोकशाही कार्यपद्धतीचा अवलंब त्यांच्या सहभागृहातील कामकाज करायला हवा ही अपेक्षा व्यक्त करत मिलिंद मस्के म्हणाले की लोकशाहीचा विषय निवडणुकीपुरता मर्यादित नाही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सभागृहात नागरिकांचे प्रश्न मांडले पाहिजेत चर्चेत सहभागी झाले पाहिजे किंवा सरकारच्या उत्तरदायित्वाचा आग्रह धरला पाहिजे यातूनच लोकशाही प्रक्रिया पुढे जाते व मजबूत होते या संदर्भात मुंबईतील आमदाराचे रिपोर्ट कार्ड 20 26 हा अहवाल महत्त्वाचा आहे लोकप्रतिनिधींनी त्यांची जबाबदारी कशी पार पाडतात हे हा आवाज ठोस माहिती व आकडेवारी सह सादर करतो या अहवालामुळे लोकप्रतिनिधीचा सहभाग अधिक सक्रिय होईल नागरिकांचे प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी येतील आणि सरकारचे उत्तरदायित्व वाढेल ही अपेक्षा प्रजा फाउंडेशन विषयी-आपली शासन व्यवस्था जबाबदार आणि उत्तरदायी व्हावी या हेतूने प्रजा फाउंडेशन गेल्या दोन दशकापासून कार्यरत आहे नागरिक समस्यावर डेटा आधारित संशोधन करणे आणि या संशोधनाचे निष्कर्ष लोकप्रतिनिधी नागरिक प्रसार माध्यमे आणि प्रशासन अशा महत्त्वाच्या समाज घटकापर्यंत पोहोचवणे असे प्रजा कामाचे स्वरूप आहे लोकप्रतिनिधी आपल्या कार्यपद्धतीतील त्रुटी समजून घ्याव्यात आणि नवीन माहितीच्या आधारे त्या दूर कराव्यात काळानुरूप आवश्यक सुधारणा कराव्यात यावर प्रजा च्या कामाचा मुख्य भर आहे वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे नागरिक आणि सरकारची ताकद वाढविणे नागरिकाचे जीवन सुलभ करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविण्यासाठी परिवर्तनाची साधने निर्माण करणे ही प्रजाती उद्दिष्टे आहेत नागरिकांच्या सहभागातून एक उत्तरदायी आणि कार्यक्षम समाज घडविण्यासाठी प्रजा वचनबद्ध आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*

सायन येथील नित्यानंद सभागृहामध्ये कन्नड संघ सायन या नोंदणीकृत संस्थेने आतिद ओन्जी कुटा साजरा .

जिल्ह्यातील तरुणांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा

ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव -**‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’*