vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी..

मुंबई, प्रतिनिधी : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत.

या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

नागरिकांना आवाहन,

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : 1070 (टोल-फ्री क्रमांक)नियंत्रण कक्ष : +91-9321587143अधिकृत ई-मेल : controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन केले आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीचे भाडेमीटर ३० नोव्हेंबरपर्यंत रिकॅलिब्रेशन करून घेण्याचे आवाहन-विहित मुदतीनंतर दररोज ५० रुपये, कमाल ५ हजार रुपये विभागीय दंडात्मक शुल्क; अलिबाग व पेण तालुक्यातील वाहनधारकांसाठीही लागू

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ४ हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ

पावसाच्या ओढीने बीड जिल्हा होरपळला; केंद्रीय पथकासमोर दुष्काळाचे भीषण वास्तव ५४ हजारांच्या खर्चातून हाती केवळ १० हजार; शेतीचे अर्थकारण कोलमडले

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‘समता सप्ताह’ सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण…

पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

प्रासंगिक लेख / जयंती दिन विशेष-कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन