vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

 

चंद्रपूर – प्रतिनिधी -आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो, पण आमची कुणी दखलही घेतं नव्हते… त्यामुळे आमचा लढा विस्मृतीत गेला होता… पण सुधीरभाऊंनी आमचं ऐकलं, आमची वेदना समजून घेतली आणि तो आवाज विधानसभेत बुलंद केला. मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणविस सोबत भेटत निवेदन दिले. आज आमच्या संघर्षाला सरकारदरबारी मान्यता मिळाली, यामुळे एक अपूर्णतेची भावना पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटते,” अशा अत्यंत भावनिक शब्दांत लोकतंत्र सेनानींनी माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या हृदयस्पर्शी भेटीत सेनानींनी सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. २० हजार रुपयांच्या सन्मान निधीबद्दल कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयानंतर, सेनानींच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळले.

एक सेनानी म्हणाले, “सुधीरभाऊ कायमच गरीब, उपेक्षितांसाठी आवाज उठवत आलेत. आमच्या मागण्या त्यांच्या प्रयत्नांमुळेच सरकारदरबारी पोहोचल्या आणि राज्यभरातील ४ हजार १०३ लोकतंत्र सैनिकांना न्याय मिळाला. सुधीरभाऊमुळे आमचा लढा व्यर्थ गेला नाही याचं आज समाधान वाटतं.या प्रसंगी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी केवळ माझं कर्तव्य निभावलं. तुमचा लढा देशासाठी होता, त्यामुळे राज्य सरकारने तुमचा मान राखावा, हे माझं वैचारिक उत्तरदायित्व होतं. उर्वरित मागण्यांसाठीही मी तुमच्यासोबतच उभा राहीन.’ या घोषणेनंतर उपस्थित सेनानींनी टाळ्यांच्या गजरात सुधीरभाऊ धन्यवाद म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

संबंधित पोस्ट

कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या १ लाख ६० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार….

vishwatmaklokswamivarta

महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे.

vishwatmaklokswamivarta

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ११७ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta