vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राहुल गांधींसोबतची भेट ठरली अविस्मरणीय डॉ. विशाल धानुरे यांना समाजहितासाठी नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा..

राहुल गांधींसोबतची भेट ठरली अविस्मरणीय डॉ. विशाल धानुरे यांना समाजहितासाठी नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा..

जालना (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची परिवारासह भेट घेण्याचा सन्मान काँग्रेसचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांना लाभला. या भेटीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. धानुरे यांनी हा क्षण आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील संस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले.

प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या संवादात देशातील वर्तमान परिस्थिती, लोकशाही मूल्ये, संविधानाचे संरक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत विचारांची देवाणघेवाण झाली. राहुल गांधी यांचा साधेपणा, आपुलकीने संवाद साधण्याची पद्धत आणि सामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी विशेष प्रेरणादायी असल्याचे डॉ. धानुरे यांनी नमूद केले. परिवारासह राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने हा क्षण अधिकच खास आणि अविस्मरणीय ठरला. या भेटीमुळे समाजहित, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे डॉ. विशाल धानुरे यांनी सांगितले. ही भेट केवळ एक आठवण नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्याची नवी ऊर्जा देणारी ठरली, अशी भावना डॉ. धानुरे यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ-आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही-राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

भाजपा जालना महानगर तर्फे गणेश मंडळाचे स्वागतआपल्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत, त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव आहे,” – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

आगामी जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस कोणतीही वैचारिक तडजोड न करता, समविचारी पक्षांना शक्य तिथे सोबत घेवून लढवणार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टीचे महा सदस्य नोंदणी अभियान सुरू

vishwatmaklokswamivarta