vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात केले ट्रेनचे जंगी स्वागत खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात केले ट्रेनचे जंगी स्वागत खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती

मुंबई प्रतिनिधी- कोकणात जाण्यासाठी नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासिय करत आहेत. हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. आज अखेर गुरुवार, दि. ३ सप्टेंबर पासून ही एक्सप्रेस ट्रेन नियमित धाऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. तर ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी कोकणवासियांसमवेत ट्रेनचे जंगी स्वागत केले.

कोकण आणि शिवसेना यांचे एक अतुट नाते आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणवासिय शिवसेनेच्या पाठिशी खंबिरपणे उभे आहेत. तर शिवसेनाही कोकणकरांसाठी धाऊन जाते. कोकणात जाण्यासाठी एक स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन असावी, अशी कोकणकरांची प्रमुख मागणी होती. लोकसभा निवडणुकीवेळी नरेश म्हस्के यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली होती.

शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत कोकणातील इतर खासदारांच्या सहकार्याने नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न केंद्रीय स्तरावर लावून धरला होता. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत बैठकाही झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला नुकतीच मंजुरी दिली होती. आज मुंबईत या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकात महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर, आमदार रविंद्र फाटक यांनी ट्रेनचे स्वागत केले.

खासदार नरेश म्हस्के हे केंद्रीय शहर विकास आणि गृहनिर्माण कमिटीच्या बैठकीनिमित्त अंदमान – निकोबार येथे असल्याने त्यांनी कोकणवासियांना व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासूनची कोकणवासियांची मागणी आज पूर्ण होत आहे, त्याचा मला आनंद आहे. आजचा दिवस हा कोकणकरांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस आहे. ठाणे रेल्वे स्थानकात आज शिवसैनिकांनी ट्रेनचे जंगी स्वागत केलेले आहे. ही ट्रेन रोज कोकणातील २२ स्थानकांवर थांबणार असून गणेशोत्सवानिमित्त कोकणकरांसाठी ही ट्रेन भेट असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.  ही नवीन ट्रेन सोडल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, राजेंद्र फाटक, प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संख्ये, गटनेते पवन कदम, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, संजय मोरे, संतोष वड, माजी नगरसेवक भास्कर पाटील, नगरसेवक राजेंद्र फाटक, दिलीप बारटक्के, संजीव कुलकर्णी, रमाकांत पाटील, किरण नाक्ती, प्रकाश पायरे, निखिल बुडजुडे, नगरसेवक संजय वाघूले, सावंत, नारकर, प्रदीप आयरे, प्रदीप वारीसे, सुशांत उतेकर, उपशहर संघटक जयेंद्र दरेकर, प्रीतम राजपूत, रीना मूदलीयार, वैशाली जोशी, अमित जोशी, सचिन माने आदी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध – महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे,बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे उद्घाटन, वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावा..