चिखली येथे उपवार्गीकरण विरोधी महामोर्चा लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे* उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती चिखली
चिखली -: (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यात व तालुका तालुक्यात वर्गीकरणाच्या विरोधात दि ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११. ०० वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चा मध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार सिद्धार्थ खरात, अमन आनंदराज आंबेडकर, मा. आ. बबनराव घोलप, भाई दीपक केदार व रुक्मिणीताई लोंढे यासह इतरही ५९ जातीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून शासनाकडे या न्याय मागण्याचे निवेदन हजाराच्या संख्येत दिल्या जाणार आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या गटात विखुरलेले संपूर्ण आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते व समाज बांधव एकत्र येऊन कुठल्याही मनभेद मतभेद न ठेवता सर्वांनी मिळून मिसळून हा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने परिश्रम घेतलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने हा मोर्चा यशस्वी होऊन शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने यायचे आहेत हा राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाची अहवाल तात्काळ सार्वजनिक करून गैरसविधानिक एक सदस्य अनंत बदर समिती रद्द करावी अनुसूचित जातीचा उपवर्गीकरणाबाबत महाराष्ट्रातील ५९ जाती पैकी ५८ जातीची मोठ्या प्रमाणात विरोध आहे त्यामुळे संविधानिक उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या जातीनिहाय सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीच व्यापक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जाहीर करावा अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वस्तीगृह कौशल्य विकास योजना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच सुविधा वाढवून त्यांची विशेष उपाययोजना करण्यात याव्या. यासह वेळेवर येणाऱ्या मागण्याचे निवेदन राज्य सरकार ला सादर करण्यात येणार आहे. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने ८ सप्टेंबर २०२६ रोजी कुठेही असा पण हजारोच्या संख्येने चिखली मध्ये दिसा असे आवाहन आंबेडकरी समाज व अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती चिखली यांनी केली आहे.