vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सावरगाव सिंचन योजनेतील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी : मंत्री छगन भुजबळ

सावरगाव सिंचन योजनेतील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, प्रतिनिधी: निफाड तालुक्यातील मौजे सावरगाव येथील प्रलंबित सिंचन योजनेच्या कामांमध्ये येत असलेल्या विविध अडचणी तातडीने सोडवून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.यावेळी लासलगाव बाह्य वळण रस्ता भूसंपादन,देवना साठवण तलाव ता. येवला जमीन वळतीकरण प्रस्ताव या प्रकल्पांबाबत सुद्धा आढावा घेण्यात आला.
सावरगाव सिंचन योजनेबाबत विविध अडचणी व आवश्यक प्रलंबित परवानग्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत,जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत,निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे,उपविभागीय अधिकारी चांदवड,जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, वन विभाग,भूमी अभिलेख नगररचना आदी विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, दत्ता रायते आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुजबळ यांनी या योजनेअंतर्गत सरकारी क्षेत्र हस्तांतरण, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांची संमती, तलाव क्षेत्रातील नोंदी व पोहोच रस्त्याच्या प्रस्तावासंदर्भातील विविध मुद्द्यांचा आढावा घेतला.
योजनेसाठी आवश्यक असलेल्या सरकारी क्षेत्र हस्तांतरणाबाबत जिल्हास्तरावर कार्यवाही सुरू असून संबंधित विभागाने तातडीने आदेश निर्गमित करावेत. देवरगाव व खडकमाळेगाव या गावातील भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या घळभरणी संमती संदर्भातील बाबी त्यांच्याशी समन्वय साधून मार्गी लावाव्यात. यासोबतच तलाव क्षेत्रात नोंद असलेल्या जुन्या यंत्रसामग्रीबाबत आवश्यक नोंदी अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
योजनेअंतर्गत तलाव ते मौजे सावरगाव येथील रस्त्यास मंजूरी प्राप्त असून काही कि.मी. रस्ता वनक्षेत्रातून जात आहे. त्याकरिता 3-2 प्रस्ताव तयार करणे आवश्यक असून तो तातडीने सादर करून संबंधित विभागांनी आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित विभागांनी प्रलंबित बाबींवर वेळेत कार्यवाही करून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी समन्वय राखावा, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या आयोजन..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा रोजगार देणारे व्हा-कुलगुरु डॉ.फुलारी कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे• नगरविकासच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta