vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम व ‘मिशन महाग्राम’चा आढावाआरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करा -अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम व ‘मिशन महाग्राम’चा आढावाआरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करा -अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करता याव्या यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. मूल्यांकनासाठी पात्र आरोग्य संस्थांनी निर्धारित निकषांची पूर्तता करून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनासाठी आवश्यक तयारी काटेकोरपणे करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी दिले.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत नव्याने गठित जिल्हास्तरीय गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी अडकुणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंग बयास यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हा गुणवत्ता नियमन कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, नऊ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने तसेच सर्व आरोग्य उपकेंद्रांची निवड करण्यात आली आहे.

निवड करण्यात आलेल्या आरोग्य संस्थांमध्ये सेवांचा गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत सर्व संस्थांचे प्राथमिक मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. तसेच अंतर्गत मूल्यांकन व जिल्हास्तरीय गुणवत्ता आश्वासन कक्षामार्फत मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

या मूल्यांकनात ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या आरोग्य संस्थांचे पुढील टप्प्यात राज्यस्तरीय चमूमार्फत तर राज्यस्तरीय मूल्यांकनात पात्र ठरणाऱ्या संस्थांचे नंतर राष्ट्रीय स्तरावरील चमूमार्फत मूल्यांकन करण्यात येईल. संबंधित यंत्रणांनी मूल्यांकनातील त्रुटींची पूर्तता करून आरोग्य संस्थांचा गुणवत्ता दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही अडकुणे यांनी दिल्या.

मिशन महाग्राम’च्या कामांचाही आढावायापूर्वी झालेल्या ‘मिशन महाग्राम’च्या जिल्हास्तरीय बैठकीतही अपर जिल्हाधिकारी अडकुणे यांनी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तनाला गती देण्याच्या उद्देशाने राज्यात ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येत आहे. या अभियानात कन्नड, गंगापूर व खुलताबाद तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

‘मिशन महाग्राम’च्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासोबतच सामाजिक परिवर्तनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावीपणे काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

०००००

संबंधित पोस्ट

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन  

मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका

एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात नागरिकांनी भीती बाळगू नये; काळजी घ्यावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवाधारित शिक्षणाचा नवा आदर्श…अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. वंदना दुधमल यांच्या अभिनव पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध; औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात आरोग्य जनजागृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड‘लोकसंवाद-२०२६’ व ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ : राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळात आरोग्य तपासणी व समुपदेशन

vishwatmaklokswamivarta