vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत रेबीज निर्मूलन प्रकल्प- दुसरा टप्पा चा शुभारंभ मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शुभ हस्ते…

मुंबईत रेबीज निर्मूलन प्रकल्प- दुसरा टप्पा चा शुभारंभ मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शुभ हस्ते…

मुंबई प्रतिनिधी-🔷मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प- दुसरा टप्पा (Mumbai Rabies Elimination Project – Phase 2) चा शुभारंभ मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आला.
🔷जागतिक रेबीज दिनानिमित्त भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे झालेल्या या कार्यक्रमात महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे अनावरणदेखील करण्यात आले
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रेबीज निर्मूलन मोहीम अंतर्गत पशुवैद्यकीय आरोग्य खात्याने घेतलेल्या विशेष प्रयत्नांचे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कौतुक केले. 🔷तसेच, वर्ष २०२५ मध्ये रेबीजमुळे मुंबईत एकही मृत्यूची नोंद न झाल्याच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्‍या राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. अजित शेवाळे, उपायुक्‍त (विशेष) श्री. विनायक विसपुते, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहअधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले, डब्ल्यू. व्ही. एस. युके मिशन रेबीजचे संचालक डॉ. अँडी गिब्सन, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
00000

संबंधित पोस्ट

कृषीआधारीत प्रशिक्षणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर. आणि अमरावती विभागातील बातम्या…

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेतील सहभागासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

vishwatmaklokswamivarta

भरती प्रक्रियेतील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई – मंत्री उदय सामंत