vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन खंबीरपणे पाठीशी उभे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील*  जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंचा ‘प्रवरा क्रीडा रत्न’ पुरस्काराने पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव*.

*खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन खंबीरपणे पाठीशी उभे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील*

जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंचा ‘प्रवरा क्रीडा रत्न’ पुरस्काराने पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव*.

 

शिर्डी , प्रतिनिधी

खेळाडूच्या यशात शिस्त, परिश्रम, जिद्द याबरोबरच पालकांचे योगदान मोलाचे आहे .खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रवरा परिसरात लवकरच एक अत्याधुनिक ‘स्पोर्ट्स अकॅडमी’ सुरू केली जाईल,”खेळाडूंच्या प्रगतीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील केले .

 

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर यश मिळवलेल्या खेळाडूंचा प्रवरा क्रीडा रत्न पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रवरा परिसरात आयोजित ‘प्रवरा क्रीडा रत्न सन्मान सोहळा २०२६-२७’ मध्ये शालेय तसेच विविध अधिकृत क्रीडा संघटनांच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७४५ खेळाडूंचा सन्मान पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला

यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त प्राध्यापक सुनील जाधव, अक्षय पवार, शुभांगी रोकडे, श्रीमती कोमल वाकळे, शंकर गदाई, गणेश पवार, फिजा सय्यद, शार्दुल गागरे व श्रीमती प्रणिता सोनम यांचा प्राथमिक स्वरूपात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “शिस्त, परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर खेळाडू घडतात. खेळाडूंच्या यशामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवडणाऱ्या खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे गुणवंत खेळाडू घडत आहेत. अशा सन्माना मुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळते. तसेच विविध क्रीडा प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची प्रेरणा मिळत असते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये टिकण्यासाठी गुणवंत आणि नेपुण्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण संस्था महत्वपूर्ण भूमिका निभावत असते.यासाठी प्रवरा परिसरात दर्जेदार सुविधा युक्त स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्याचा मानस आहे. असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, डॉ. सुष्मिता विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, कैलास नाना तांबे , गुणवंत खेळाडू, पालक प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते.क्रीडा पुरस्कारप्राप्त श्रीमती कोमल वाकळे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना मिळालेल्या सन्माना मुळे अधिक आत्मविश्ववास निर्माण होऊन प्रोत्साहन मिळाले आहे, याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी आभार मानले.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात घुमतेय ‘आरती समतेची’; हेदली गावाचा अनोखा सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

उत्तराखंड प्रशासनानं चारधाम यात्रेकरू आणि पर्यटकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून सुरक्षित प्रवास करण्याचं केलं आवाहन. 

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

vishwatmaklokswamivarta