vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (#SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने दिली मुदतवाढ 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (#SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने दिली मुदतवाढ

राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (#SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने आज झालेल्या बैठकीत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे संकलित करतील.

प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही,कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.

बेघर, मजूर व गरजू नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष,

राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सुलभता मिळावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका स्पष्ट केले आहे.@ECISVEEP

संबंधित पोस्ट

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

26 सप्टेंबरला हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात शिबिराचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

बंदरांची कामे दर्जेदार व कालमर्यादेत पूर्ण करावीत – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहाय्य -*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta