vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील• प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरे घेण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश• लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार पीक कर्ज शिबीरांचे आयोजन

कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील• प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरे घेण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश• लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार पीक कर्ज शिबीरांचे आयोजन

बुलढाणा, प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी विनाविलंब नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने विशेष पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांचा जागेवरच निपटारा करावा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

अनियमित पर्जन्यमानामुळे नुकसान झालेल्या पिकांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील (दि. 24 रोजी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानी त्यांनी सूचना दिल्या. दौऱ्यादरम्यान आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, लीड बँकेचे कौशद्रसिंह कुमार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवळे,ॲड नाझेर काझी, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहणी दरम्यान पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी तालुकास्तरावर विशेष पीक कर्ज शिबिरे आयोजित करावीत. या शिबिरांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचे अर्ज, कागदपत्रांची पूर्तता आणि कर्ज प्रकरणांची आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून पीक कर्जाचे वितरण सुनिश्चित करावे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ ज्या बँकेच्या शाखेमार्फत शेतकऱ्याला मिळाला आहे, त्याच संबंधित बँकेने चालू खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना इतर बँकांच्या शाखांमध्ये विनाकारण जावे लागू नये, याची दक्षता संबंधित शाखा व्यवस्थापकांनी घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले.

शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक वित्तपुरवठा वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा टाळाटाळ होऊ नये.आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहित प्रक्रियेनुसार कर्ज मंजुरी व वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

जिल्ह्यातील २८२ बँक शाखांना १ लाख १६ हजार खात्यांसाठी ९७० कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार ५०० खात्यांना ७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. विशेषतः खासगी बँकांनी पीक कर्ज वितरणाचा वेग वाढवून पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पात्र शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष पीक कर्ज शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह कर्ज प्रकरणे सादर करावीत आणि खरीप हंगामासाठी उपलब्ध पीक कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आमदार मनोज कायंदे, संजय गायकवाड व श्वेता महाले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने विशेष पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व सर्व बँकाना दिले.

000000

संबंधित पोस्ट

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी-वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

माथेरान-नेरळ घाट रस्त्यावर जड-अवजड वाहनांना बंदी सोमवार ते गुरुवारच रस्ता दुरुस्तीची कामे; जीवनावश्यक सेवांना सूट

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ

vishwatmaklokswamivarta

ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार      -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह,शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta