vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपले मतदार वगळले जाणार नाही याकडे लक्ष द्या- संपर्कप्रमुख सुनिल पाटील

आपले मतदार वगळले जाणार नाही याकडे लक्ष द्या- संपर्कप्रमुख सुनिल पाटील

जालना, (प्रतिनिधी)-मी यादीवर काम करणारा कार्यकर्ता असून तुम्ही सुद्धा मतदार यादीवर काम केले पाहिजे, बीएलएच्या नेमणुकीकडे लक्ष देऊन एसआयआरमध्ये आपले मतदार वगळले जाणार नाही याकडे सर्व बीएलए यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे शिवसेना जालना लोकसभा संपर्कप्रमुख सुनिल पाटील यांनी लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठकीप्रसंगी सांगितले.

जालना जिल्ह्यात शिवसेनेचे गत वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा संकल्प आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. शिवसेनेत सर्वांचा सन्मान राखल्या जाईलकाळजी नसावी आपण सर्व मिळून लोकसभा मतदारसंघ घडवू यासाठी प्रत्येकाने आपआपल्यावर असलेल्या जबाबदारीने कार्य करणे गरजेचे आहे. आपल्यावर पक्षाने दिलेल्या पदाला व जवाबदारीला न्याय देण्याचे काम करा. यापुढे मी तालुकास्तरावर बैठका घेणार असून प्रत्येक पदाधिकार्‍यांचा आढावा घेण्यात येणार

आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकार्‍यांनी संघटना बळकटीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जालना लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता जालना,बदनापूर, सिल्लोड,पैठण या चार मतदारसंघात शिवसेनेचे आमदार होते. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा आम्ही संकल्प घेत आहोत प्रत्येकालासोबत घेऊन संघटना वाढविण्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालो आहे असे सांगितले.यावेळी जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, हनुमानधांडे, भगवानराव कदम, संभाजीनगरचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर,रमेश गव्हाड,तालुकाप्रमुख दिनेश काकडे, कैलास पुंगळे, कुंडलिक मुठ्ठे,रामेश्वर फंड, शहरप्रमुख दीपक रणनवरे, कुमार रुपवते, महेश पुरोहित,पदवीधर समन्वयक संजय जाधव यांच्यासह बाबुराव कायंदे, सुदाम काळे, फैझान मिर्झा,अंकुशराजे जाधव,अर्जुन ठोंबरे, तुळशीराम काळे,गजानन लहाने,यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

००००फोटो ओळी……२४-जालना लोकसभा संपर्कप्रमुख सुनिल पाटील यांनी लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेवून त्यांना मार्गदर्शन केले.

००००००००

संबंधित पोस्ट

जम्मू काश्मीरच्या: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील तीन संशयितांचे रेखाचित्र जारी…

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भारत सरकार पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

राज्यपालांचे श्रीचक्रधर स्वामी यांना अभिवादन

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे