vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मंत्री जयकुमार रावल जिल्ह्यातील चारही तालुके दुष्काळी परिस्थितीच्या ‘प्रथम कळ’मध्ये

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मंत्री जयकुमार रावल-जिल्ह्यातील चारही तालुके दुष्काळी परिस्थितीच्या ‘प्रथम कळ’मध्ये

राज्य प्रतिनिधी धुळे, : आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या आणि पिके वाचणवण्यासाठी धडपडणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याांच्या नेतृत्वाखालील शासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. खरीप हांगाम २०२६ मधील पर्जन्याची तूट व अन्य घटकांच्या आधारे धुळे जिल्ह्यातील धुळे,साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीच्या ‘प्रथम कळ’मध्ये समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ मिळणार असल्याचे राज्याचे पणन व राज्यशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना पालकमांत्री जयकुमार रावल म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला एकटे पडू दिले जाणार नाही. शासन आणि प्रशासन त्याच्या पाठीशी खांबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याांच्या नेतृत्वाखाली शासनाने ‘प्रथम कळ’मध्ये आलेल्या तालुक्यांसाठी विविध सवलती लागू केल्या असून, धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा त्यात समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना आवश्यक दिलासा मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्याांसमोर पीक, पाणी, चारा आणि उदरनिर्वाहाचे प्रश्न एकाच वेळी उभे राहतात. अशा काळात प्रत्येक निर्णय हा शेतकऱ्याच्या अडचणी कमी करणारा असला पाहिजे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरी, गोठे तसेच अन्य पात्र कामे मोठ्या प्रमाणात सुरू करता येतील. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.

आगामी काळात पाणीटांचाईची शकयता लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही गावातील नागरिकांना वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, असेही

पालकमंत्री जयकुमार रावल याांनी सांगितले.

ते म्हणाले, टांचाई जाहीर केलेल्या गावाांमध्ये शेतकऱ्याांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही. त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच पिण्याचे व जनावरांसाठी पाणी याांचे नियोजन करण्याचाही शासन निर्णयात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे साांगून पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले,“आज प्रत्येक थेंब पाणी अमूल्य आहे. उपलब्ध पाणी कुठेही वाया जाता कामा नये. जिथे शक्य असेल तिथे पाणी अडवून ठेवावे आणि जिथे अत्यावश्यक आहे तिथेच प्राधान्याने त्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिक आणि जनावरांसाठी आवश्यक पाण्याचे काटेकोर नियोजन करावे.”प्रथम कळ’ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी,सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्रे व जीपीएस समन्वयांक संकलित करावेत आणि पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तातडीने सादर करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील पंचनाम्यांची कार्यवाही विलंब न करता सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

“शेतकऱ्याच्या शिवारातील प्रत्यक्ष परिस्थिती शासनापर्यंत अचूक आणि लवकर पोहोचणे महत्त्वाचे आहे. पंचनामे, छायाचित्रे आणि जीपीएस समन्वयाांकासह अहवाल जितक्या तत्परतेने तयार होईल, तितक्या लवकर पुढील मदतीची प्रक्रिया गतीने पुढे नेता येईल,” असे त्याांनी साांणगतले.

शेतकऱ्याांनीही पीक पंचनाम्याच्या प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे. पिकांच्या नुकसानाची नोंद वेळेत करून घ्यावी. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, याची काळजी घेत प्रत्यक्ष शेतापयंत पोहोचून कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचनाही पालकमंत्री जयकुमार रावल याांनी दिल्या.

दुष्काळ हा केवळ पावसाच्या तुटीचा प्रश्न नसून तो शेतकऱ्याचे पीक, कुटुंब, पशुधन आणि उदरनिर्वाहाशी जोडलेला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या प्रत्येक सवलतीचा आणि उपाययोजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूपर्यंत वेळेत पोहोचणवण्यासाठी स्वतंत्र सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने, समन्वयाने आणि तातडीने काम करावे, असे पालकमंत्री जयकुमार रावल याांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घ्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील  

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडुंनी देशाचे नाव उंचावावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर महास्वच्छता अभियान; आमदार-अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर आणि वेरुळ चकाचक-स्वच्छता हीच ईश्वर सेवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी-स्वच्छतेत सातत्य राखणे गरजेचे- आ. प्रशांत बंब

vishwatmaklokswamivarta