vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

 

( सुरेश गायकवाड )

मुंबई प्रतिनिधी- विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मातृशक्ती दुर्गावाहिनी सातत्याने महिला भगिनींचे संघटन करून महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असते. राणी दुर्गावती यांनी मुघलांच्या विरोधात प्रखरतेने लढा देत गोंडवणा साम्राज्याचे रक्षण केले. अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा मुघलांनी उध्वस्त केलेल्या हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार, समाजातील सर्व ज्ञाती, पंथ, संप्रदायामध्ये सद्भाव राहण्यासाठी समाजकार्य, तसेच भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. राणी दुर्गावती यांचे ५०० वी जयंती वर्ष व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वी जयंती वर्ष निमित्त विश्व हिंदू परिषद मातृशक्ती , दुर्गावाहिनी यांच्या वतीने दि .५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत तब्बल ३ हजार महिला, तरुणींच्या उपस्थितीत संचलन पार पडणार आहे.

याशिवाय संध्या. ४.३० वा. राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे संचलन समारोप सभा पार पडेल. या सभेला परमपूज्य साध्वी ऋतंभरा दीदी माँ उपस्थितांना संबोधित करतील. तेव्हा जास्तीत जास्त महिला, भगिनींनी यांनी संचलनात व समारोप सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

 त्याचसोबत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दि. ५ जाने. पासून देशपातळीवर सरकारी नियंत्रणातून मंदिराच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियानाची सुरुवात विजयवाडा, आंध्रप्रदेश येथे भव्य सभेने होणार आहे. या जनजागृती सभेत तब्बल ५ लाख हिंदू समाज सहभागी होणार आहेत असे विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांत महिला दुर्गा वाहिनीच्या अध्यक्षा मनिषा भोईर, सचिव स्वाती भोसले आणि उपाध्यक्षा प्रिया सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित पोस्ट

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा”या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सर्वोत्तम नागरिक सन्मान सोहळ्यात १८ मान्यवरांचा गौरव

तळागाळातील लोकांना कायद्याच्या माहितीसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रजिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती मोहीम

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta