vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

 सातारा द प्रतिनिधी  – जिल्ह्यात एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा एड्स नियंत्रण समिती आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीची बैठक झाली त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांच्या सह समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यातील एड्स रुग्णांच्या उपचारांचा योग्य पाठपुरावा करावा, अशा सूचना करून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, सर्व आरोग्य केंद्रांमध्ये एड्स तपासणी करण्यात यावी. तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये तंबाखू मुक्त करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करावी. यापूर्वी तंबाखुमुक्त झालेल्या शाळांची नियमित तपासणी करावी. तंबाखू विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी त्याचे व्यसन जडलेल्या मुलांचे समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात यावा. तसेच शाळांमध्ये मुलांच्या मौखिक आरोग्य तपासणीची शिबिरे घेण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

०००००

संबंधित पोस्ट

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळेदोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच..

नमुंमपा ईटीसी केंद्राच्या मदतीने सात महिन्यांच्या बाळाची कॉक्लियर इम्प्लान्ट (Cochler Implant) सर्जरी यशस्वी

vishwatmaklokswamivarta

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

“स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची”**जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गतजिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गरजूंना चष्मे वाटप- अभियानात 11 हजार रूग्णांची नेत्र तपासणी- 1205 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

शिराळ्यात 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान मोफत आरोग्य शिबीर

vishwatmaklokswamivarta