vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फूट प्रिंट ऑफ डिग्निटी’ पुस्तकाचे प्रकाशन

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-‘फूट प्रिंट ऑफ डिग्निटी’ पुस्तकाचे प्रकाशन..

नागपूर, प्रतिनिधी : झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे मालकी पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आणि त्याअनुषंगाने झालेले निर्णय या संपूर्ण प्रक्रियेवर सीएफएसडी (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) च्या लीना बुद्धे यांनी लिहिलेल्या ‘फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी : बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन आज ‘रामगिरी’ येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकीपट्टे मिळणे अतिशय आवश्यक होते. ते दिल्यामुळे त्यांचे जीवन बदलल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, त्यांचा सर्वसमावेशक विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. झोपडपट्टी विकासासाठी हे पुस्तक दिशादर्शक असणार आहे. मी नागपूरचा महापौर असतानाच या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे पुढे आमदार म्हणूनही हा विषय लावून धरला. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या या पुस्तकाच्या लेखिका लीना बुद्धे यांनीही हा गुंतागुंतीचा विषय अभ्यासपूर्ण मांडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मालकी पट्टे देण्याचा मी निर्णय घेतला. अनेक खासगी जागांवरही झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यांच्या नियमितीकरणासाठीही शासनाने निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेचे या पुस्तकामुळे दस्तावेजीकरण झाले आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी लेखिका श्रीमती बुद्धे यांचे अभिनंदन केले.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत…

vishwatmaklokswamivarta

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत- पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती· जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ – जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा.

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे 6 आरोपी २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले

बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी!- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती