vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे 6 आरोपी २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे 6 आरोपी २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले

 

राज्य प्रतिनिधी-अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे 6 आरोपी २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले

 

पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार -जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री १० वाजता विंचरणा नदीजवळ त्यांच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. मात्र या बोलण्यचाचा राग मनात धरून त्या अज्ञात व्यक्तींनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय २०, रा. जामखेड) हा युवक आला. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात आरोपींनी कुणाल आणि आदित्य यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली. हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर) आणि त्याच्या साथीदारांनी केला असून ते नेवासा मार्गाने गेल्याचं कळतात पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले.

यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर (वय ३३, रा.निपाणी, छत्रपती संभाजीनगर), नकुल विष्णु मुळे (वय ४०, रा.खेर्डा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), शरद अंकुशराव शिंदे (वय ३८, रा.पुसेगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), गणेश गोविंद आरगडे (वय ३०, रा.खंडाळा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), रावबहादुर श्रीधर हारकळ (वय ३५, रा.सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर), सुशील ताराचंद गांगवे (वय ३०, रा.पद्यपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित पोस्ट

सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती..– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन,नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही…

vishwatmaklokswamivarta

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

सेवाभाव, समर्पण आणि मानवतेचा दिव्य उत्सव78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ मुंबई व महाराष्ट्रातून हजारो सेवादार समालखाला रवानाआत्ममंथन करून मनामध्ये व्याप्त दुर्गुण दूर करा- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज..

vishwatmaklokswamivarta