vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

#महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकीहक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्याने राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभूनकाशा, आयडीआरएस यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालीचे एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या महसूल आणि जमीनविषयक सुधारणामधील हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाभूमी स्टॅक प्रणाली अभिलेखांचे डिजिटल भांडार ▶️३.५ कोटींहून अधिक अधिकार अभिलेख (७/१२ व ८-अ ▶️१.५ कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका▶️४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख▶️नोंदणी विभागाचे दस्त क्र. २ च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती

संबंधित पोस्ट

ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

..महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.   त्यामुळे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आता ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.  

राजकीय धावपळीतही ‘आजी’ दिसली; पालकमंत्र्यांनी ताफा थांबवला!शिवतीर्थाच्या भिंतीलगत बसलेल्या ८० वर्षीय वृद्धेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आस्थेवाईक चौकशी; पोलिसांना कुटुंबीय शोधून घरी सोडण्याचे अथवा वृद्धाश्रमात दाखल करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

लिपिक-टंकलेखक’ निवड होणाऱ्या उमेदवारास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यभरातील रिक्त पदावर काम करण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा