
भ्रष्टाचाराबाबत जनजागृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, प्रतिनिधी: भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविले पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार राज्यामध्ये 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक, बृहन्मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 022-24921212,24922618, संकेतस्थळ htps://acb.maharashtra.gov.in, ईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai @mahapolice.gov.in आणि 8828241064 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी केले आहे.
000



