vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानसर्व मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मतदान पथके साहित्य घेऊन रवाना, पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 159 मतदान केंद्रे असून 88 हजार 70 मतदार- शिक्षक मतदारसंघासाठी 48 मतदान केंद्रे असून 8 हजार 62 मतदार

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानसर्व मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मतदान पथके साहित्य घेऊन रवाना, पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 159 मतदान केंद्रे असून 88 हजार 70 मतदार- शिक्षक मतदारसंघासाठी 48 मतदान केंद्रे असून 8 हजार 62 मतदार

            सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ साठी शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावरून मतदान पथकांना निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. सर्व पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतपत्रिका वैध ठरावी या उद्देशाने निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून मतदान करावे. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे

    पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ४७ उमेदवार आणि शिक्षक मतदार संघासाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदानासाठी सांगली जिल्ह्यात एकूण 159 मतदान केंद्रे असून 88 हजार 70 इतके मतदार आहेत. तर पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदानासाठी सांगली जिल्ह्यात एकूण 48 मतदान केंद्रे असून 8 हजार 62 इतके मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे विभागातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक व पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे.

   शिक्षक व पदवीधर अशा दोन्ही मतदार संघांसाठी एका मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई याप्रमाणे ५ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात राखीव कर्मचाऱ्यांसह सुमारे 1 हजार 614 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.

  सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावरून मतदान पथकांना आवश्यक निवडणूक साहित्य वितरित करण्यात आले. त्यानंतर सर्व मतदान पथके संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत. मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देणे, मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची तपासणी करणे तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान प्रक्रिया पार पाडणे, यासाठी मतदान पथकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी निश्चित करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच मतदान प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.    मतदान पथके संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचल्यानंतर मतदानासाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करतील. निवडणूक प्रक्रियेत नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करून आपापली जबाबदारी पार पाडणार आहेत.      मतदारांना यादीत नाव शोधता यावे, यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Search या सर्च इंजिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

शहर सुंदर ठेवणा-या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत…

स्वित्झर्लंडमधील ‘दावोस’मध्ये गोव्याच्या ‘दैवी कणां’ची भुरळ; विज्ञानाला न उलगडणारे कोडे जागतिक पटलावर

कोरेगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

यलो अलर्ट; सोजिल्ह्यातसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; – अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन