vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले…

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले…

        सांगली, प्रतिनिधी : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक- २०२६ साठी सांगली जिल्ह्यात शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ मधील अधिकारांचा वापर करून सांगली जिल्ह्यातील 23 ऑक्टोबर 2026 रोजी भरणारे एकूण 13 ठिकाणचे दैनंदिन वआठवडा बाजार पूर्णपणे बंद ठेवून पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.    आठवडा बाजार बंद असलेल्या गावांमध्ये मिरज तालुक्यातील बुधगाव, मालगाव, सांगली मनपा क्षेत्रातील पंचशिल नगर – प्रभाग क्रमांक 1 व कुपवाड मनपा क्षेत्रातील कुपवाड (वारणाली गेट, लक्ष्मी मंदिर, कापसे प्लॉट – प्रभाग 3), कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग, तासगाव तालुक्यातील विसापूर, जत तालुक्यातील माडग्याळ, खानापूर (विटा) तालुक्यातील खानापूर, कडेगाव तालुक्यातील कडेगाव, वाळवा तालुक्यातील वाळवा, चिकुर्डे व आष्टा तसेच शिराळा तालुक्यातील शिरशी या गावांचा समावेश आहे.      या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 कलमांतर्गत कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन प्रकल्पाचे लोकार्पण

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

कृष‍ि विभागाची धडक कारवाई-अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण