vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा,खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत..

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा,खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत..

            पुणे, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयान्वये या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या १६ ऑक्टोबर २०२६ च्या सुधारित परिपत्रकानुसार खासगी आस्थापनात काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी २ ऐवजी ४ तासांची विशेष सवलत द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

            निवडणुकीतील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही रजा केवळ त्या मतदार संघाचे मतदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्याने सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

            ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी कळविलेल्या दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली -उगले यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पाटण आगाराच्या १३ नवीन एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; बंद्यांना बांधली राखी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात मिरजेतील P1-P2 पार्किंग अधिसूचना शिथिल

vishwatmaklokswamivarta

संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग-संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे गोव्यातील प्रस्तावित विश्वविद्यालय लवकर व्हावे ! – पू. पं. केशव गिंडे*

श्रीवर्धन तालुक्यात सप्टेंबर महिन्यासाठी धान्याचे नियतन मंजूर अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे वितरण

vishwatmaklokswamivarta