vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

24 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

24 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

                नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2026-27’ चा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.00 वा. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न होत आहे.

नवी मुंबई शहराने स्वच्छतेच्या क्षेत्रात देशपातळीवर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, निवासयोग्य शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वत्र गौरव केला जातो. त्या अनुषंगाने लोकसहभागावर भर देणारे विविध उपक्रम राबविण्यात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर असते. त्यास अनुसरून गणेशोत्सवासारख्या एकात्म भावना वृध्दींगत करणा-या उत्सवातून संस्कृतीची जपणूक केली जात असताना उत्तम प्रकारे गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे, संस्था व नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी महापौर श्रीम.सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापौर चषक श्रीगणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन सार्वजनिक व घरगुती अशा दोन विभागांमध्ये करण्यात आलेले आहे.

या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि विविध समाजोपयोगी विषयांबाबत जनजागृती व प्रबोधन करणा-या संस्था, मंडळे व नागरिकांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केले जाणार आहे. जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व नागरिक पर्यावरणपूरक आणि समाजप्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतात त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

स्पर्धेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त उत्सव, जलसंवर्धन, आरोग्यविषयक जनजागृती, सामाजिक संदेश तसेच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच घरगुती गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षकांमार्फत उत्सवस्थळी भेट देऊन मंडळाकडून व्हिडिओ क्लिप्स व कागदपत्रे जमा करून त्याचे परीक्षण करुन स्पर्धेचे मूल्यमापन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम सोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

1 क्र.पुरस्कार श्रेणी क्रमांक पारितोषिक रक्कम,उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्कार

प्रथम-70,000 + स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

2-द्वितीय 30,000 + स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

3 तृतीय 25,000 + स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

4 उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव पुरस्कार

(5 दिवस)-प्रथम10,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्

5 द्वितीय 8,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

6 तृतीय 6,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

7 उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव पुरस्कार (10 दिवस)

प्रथम-10,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

8 द्वितीय 8,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

9 तृतीय 6,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

10उत्कृष्ट पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्कार

प्रथम 45,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

11-द्वितीय 30,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्

12 तृतीय25,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

13 उत्कृष्ट गणेश मूर्ती पुरस्कार

सर्वोत्तम22,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

14 उत्कृष्ट देखावा (थीम) पुरस्कार

सर्वोत्तम22,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

15 उत्कृष्ट सजावट पुरस्कार सर्वोत्तम22,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

16उत्कृष्ट पारंपरिक गणेशोत्सव पुरस्कार

सर्वोत्तम 22,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

17उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पना पुरस्कार सर्वोत्तम22,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

18उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार

सर्वोत्तम22,000 + स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

19उत्कृष्ट सामाजिक संदेश पुरस्कार

सर्वोत्तम22,000 +स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

एकूण पारितोषिक निधीरु. 4,27,000          नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या पदनामाने सुशोभित महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2026-27 स्पर्धेतील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळ विजेते यांचा पारितोषिक वितरण समारंभ दि.24 ऑक्टोबर 2026 रोजी, दुपारी 03:00 वा., विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न होणार आहे.याप्रसंगी नवी मुंबईतील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच नागरिकांनी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती श्री. गिरीश कान्हा म्हात्रे व उपसभापती श्री. राजु भालचंद्र मढवी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर असे करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य• मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण-    महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासनाची विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई- मंत्री छगन भुजबळ

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन