vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, प्रतिनिधी: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्याद्वारे जिल्ह्यातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांची 2026 ते 2029 या कालावधीसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सहकार कायदा, निवडणूक नियम आणि संबंधित कामकाजाचा पुरेसा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शासकीय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, तसेच अर्बन बँक फेडरेशन, पतसंस्था फेडरेशन, साखर कारखाना महासंघ यांसारख्या स्तरावरील फेडरल संस्थांमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, अनुभवी वकील, सनदी प्रमाणित लेखापरीक्षक (CA), स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेवानिवृत्त शिक्षक आणि खाजगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकही या पदासाठी पात्र ठरू शकतील.

     इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिनांक 31 मे 2026 पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती, सहकार संकुल, कांता नगर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. या निवडीबाबतच्या सविस्तर अटी, शर्ती आणि अर्जाचा नमुना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या (http://scea.maharashtra.gov.in) आणि सहकार आयुक्त कार्यालयाच्या (http://sahkarayukta.maharashtra.gov.in) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील हडपसर इथल्या उषाकिरण रुग्णालयाजवळ काल रात्री आढळलेली बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं सुरक्षितस्थळी नेऊन यशस्वीरीत्या निकामी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ..

सांगलीत फटाके कारखान्यात भीषण स्फोट, पाच किमीपर्यंत हादरे, गाड्या आणि घराच्या काचा फुटल्या; दोघे गंभीर जखमी…

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

vishwatmaklokswamivarta