vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यात 28 कोटी जमा…

मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यात 28 कोटी जमा…

      अमरावती, प्रतिनिधी) : होळीनिमित्त राज्यातील मनरेगा मजुरांसाठी 67 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील 28 कोटी 39 लाख रूपयांचा निधी मेळघाटसाठी आज उपलब्ध झाला आहे. हा निधी मजुरांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात आला आहे.

    होळीनिमित्त आदिवासींना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला. याची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली. त्यानुसार आज मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली,

     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मेळघाट या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम देताना वाढीव लेबर बजेट मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे काही कालावधीपासून मजुरी अदा करणे प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मजुरांची मजुरी तातडीने जमा केली आहे. मजुरीचा निधी तातडीने मिळावा, यासाठी मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनीही याबाबत पाठपुरावा केला आहे.

  केंद्र शासनाने 19 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याच्या 13 कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये वाढ करून सुधारीत 16 कोटी मनुष्यदिवसांच्या बजेटला मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी वेळेत अदा केली जाणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषी संकल्प अभियानाचे-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..             

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही  सोडू नय- सचिव गि. ग. कांबळे. – कायदेविषयक शिबीर, जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta