vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

कोकणातील मराठी शाळांच्या संवर्धनासंदर्भात तसेच शिक्षण खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सामंत, महेंद्र दळवी, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते

मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, शाळांचे समायोजन करताना कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पहिली ते नववीपर्यंत किमान दोन विद्यार्थी असले तरी शिक्षक उपलब्ध करून दिले जातात. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अल्प असल्यास त्यांना जवळच्या शाळेत वर्ग केले जाते.

विद्यार्थ्यांना शिक्षणस्नेही वातावरण निर्माण करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हा शासनाचा उद्देश आहे. शाळांचा पट वाढवण्यासाठी शिक्षकांनीही सकारात्मक व विशेष उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. कोकण विभागातील भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन शिक्षक पदे भरणे, मराठी व उर्दू भाषेतील शिक्षक उपलब्ध करून देणे आदी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ मध्ये५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सन 2026-27 मधील नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठीउद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार – कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे* *शासनाचे धोरण- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे* *पाटील*

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

नवी मुंबईतील अभिनव वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केली पाहणी