vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी…

 

पुणे, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच आरती केली. यावेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाचा कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ तसेच श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्ट येथील श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच महापौर मंजुषा नागपुरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार नितीन नबीन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, योगेश टिळेकर, हेमंत रासणे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासणे, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजविण्याचा घेतला आनंद, श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्टच्या गणपती परिसरात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पारंपरिक ढोल-ताशा गजरात पथकाने स्वागत केले. यावेळी त्यांनी ढोल वाजविणाऱ्या युवकाकडून टिपरू काठी घेत स्वतः ढोल वाजविण्याचा आनंद घेतला.

0000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र 

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 🎉🚆भारतीय रेल्वे कडून-होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी खुशखबर 🎉

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta