vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी 11 सप्टेंबर रोजी संस्था स्तरीय फेरी

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी 11 सप्टेंबर रोजी संस्था स्तरीय फेरी

ठाणे, प्रतिनिधी) :- शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या संभाव्य रिक्त जागांसाठी संस्था पातळीवरील अतिरिक्त प्रवेश फेरी (Vacancy Round) दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे

प्रवेश फेरीचे सविस्तर वेळापत्रक (दिनांक 11 सप्टेंबर 2026)· संस्थेत नाव नोंदणी (Registration) : सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत· तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : दुपारी १२:३० वाजता· अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : दुपारी १:३० वाजता· प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया : दुपारी २:०० वाजल्यापासून पुढेप्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे (Original Documents) आणि निर्धारित शुल्क घेऊन वरील दिवशी सकाळी १०:०० वाजता संस्थेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

सदर प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती तथा मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, ठाण्याच्या www.gpthane.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा सुविधा केंद्र (FC3011) अथवा ८०९७२१५०५४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आह

000000000

संबंधित पोस्ट

तरुण वयात गोर-गरीब व समाजाच्या सुख-दु:खात उपयोगात येणाराच खरा नायक :जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश -त्यानुसार महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात राखीव बेड्सची व्यवस्था…

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षक पदभरती घोटाळा प्रकरणी राज्यस्तरीय एसआयटी गठितआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या प्रश्नानंतर शिक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित..

भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण होणार !· मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta