vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

मुंबई, प्रतिनिधी: औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईत मंगळवार २१ एप्रिल पासून आयोजित करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, विधान परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद (राज्यमंत्री दर्जा) मनिषा कायंदे, महापौर रितू तावडे, लोकसभा सदस्य अनिल देसाई, विधान परिषद सदस्य सुनील शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार महेश सावंत, नगरसेवक यशवंत किल्लेदार आदी लोकप्रतिनिधींसह कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड, असंघटीत कामगार विभागाचे विकास आयुक्त सुशील खोडवेकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कामगार विभागाच्या उपसचिव रोशनी कदम – पाटील, कामगार कल्याण आयुक्त भास्कर मोरडे यांची उपस्थिती असेल.

पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला (खुला) अशा तीन गटात स्पर्धेचे सामने होतील. तिन्ही गटातील अंतिम विजेत्या संघाना प्रत्येकी ५० हजार, अंतिम उपविजेत्या संघांना प्रत्येकी ३५ हजार आणि अंतिम उपांत्य उपविजेता संघाना प्रत्येकी २० हजार रुपये बक्षिस दिले जाईल. तसेच विजेत्या संघांना सांघिक चषक, खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल.

राज्यभरातून सुमारे ११० हून अधिक संघ स्पर्धेत सहभागी झाले असून २१ ते २५ एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत स्पर्धेचे सामने होतील. रसिक प्रेक्षकांना हे सामने मोफत बघता येणार असून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या mhlabourwelfare या युट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर देखील केले जाणार असल्याची माहिती कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात आली आहे.

000

संबंधित पोस्ट

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा मागण्या मान्य न झाल्यास जालना जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात..

vishwatmaklokswamivarta

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण

vishwatmaklokswamivarta

भिवंडी येथील  २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

प्रत्येकाच्या स्मृतीकोषात शिक्षकाचे स्थान अढळ- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी