vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर मुरूम येथे मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबीर

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुरूम येथे मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबीर

धाराशिव,द प्रतिनिधी ‘‘पैशांअभावी कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. आरोग्य शिबिरात उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेतली जाईल. त्याच्या आजाराचे दुःख कमी करून आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी शासनाची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी मदत करेल,अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

आज, (दि. ६ सप्टेंबर) उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,जिल्हा आरोग्य विभाग आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर-२०२६’चे उद्घाटन राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.त्यानंतर आयोजित

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे होते.विधानपरिषद सदस्य आमदार बसवराज पाटील, विधानसभा सदस्य आमदार प्रवीण स्वामी,मुरूम नगरपरिषदेचे अध्यक्ष बापूराव पाटील,मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे आरोग्य उपसंचालक डॉ.स्वानंद सोनार आणि लातूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती.साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या,आधुनिक उपचार पद्धतींचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यात येत आहे.आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांना स्मार्टफोन देण्याची मागणीही पूर्ण करण्यात येईल

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाख रुपयांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गरजू रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली जात आहे.अवयव प्रत्यारोपणासाठी २४ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचे साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५,४६,०१० अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा..

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून सीसीआयच्या जाचक अटी रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा…