vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२०२६ करीता अद्याप नूतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा पात्र विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्वयंम योजनेच्या नूतनीकरणाचे अर्ज http://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

विहित मुदतीत नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास प्राप्त न झाल्यास, त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात गुणवत्ता यादीद्वारे निवड झालेली आहे व ज्यांना संबंधित वसतिगृहाकडून आवेदनपत्रे निर्गमित करण्यात आलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच प्रवेश घ्यावा. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेत हस्तांतरित करण्यात येणार नाहीत, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन  मुंबई उपनगरात 21 नोव्हेंबरला मेळावा…

vishwatmaklokswamivarta

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा..

वेबसाईट बंद असल्याने नवीन, जुने रेशनकार्ड मिळत नसल्याने-काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना एका निवादानाद्वारे सुरू करण्याची मागणी केली आहे.

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जयकिसन शिंदे ठरले ‘कृषिभूषण’, सोमीनाथअवघड यांना ‘युवा शेतकरी पुरस्कार’; जालना जिल्ह्याचा मुंबईत दणदणीत गौरव