vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

लोकसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद- महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती;- ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ..

लोकसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद- महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती;- ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ..

        सांगली, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सांगली येथील शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ येथे महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांबाबत लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    या कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत कार्यरत जिल्हा चाईल्ड लाईन सांगलीच्या आरती निडसोसे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. चाईल्ड लाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, बालसंगोपन, अनाथ प्रमाणपत्र, लेक लाडकी, लाडकी बहीण आदी योजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत महिलांशी संवाद साधला. उपस्थित महिलांनी विविध योजनांबाबत विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच महिलांना विभागाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

    शासकीय योजनांचा लाभ घेताना काही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचा लाभ     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान-2026 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ येथे आयोजित आरोग्य शिबिराचा भाविक व नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.       या कार्यक्रमास शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राहुल डूबल व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा चाईल्ड लाईनचे शानुर दानवडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, शंका असल्यास अधिकृत वैद्यकिय  व्यवसायिकांचा सल्ला घ्या- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 28 जून 2026 रोजी..

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विशेष मोहिमांना गती

स्टॉप डायरिया” राष्ट्रीय मोहीम ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू