vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

लेख-हिवताप दूरीकरण हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे

लेख-हिवताप दूरीकरण हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे

आरोग्य प्रतिनिधी-२५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिनानिमित्त या साथरोग निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य व मार्फत केल्या जात आहेत.

हिवताप हा ‘प्लासमोडीयम’ या परोपजीवी जंतुंमुळे होणारा आजार असून, तो प्रामुख्याने ॲनाफिलस मादी डासाच्या चावल्यामुळे पसरतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने *व्हायव्हॅक्स (P.V.) आणि फॅल्सीफेरम (P.F.)हे दोन प्रकारचे जंतू आढळतात. या वर्षीचे घोषवाक्य DRIVEN TO END MALARIA: NOW WE CAN. NOW MUST” (हिवताप दुरीरणासाठी कटिबद्ध: आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे) असे आहे.आपल्याला या आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करते.  हिवतापाचा अधिशयन काळ साधारणपणे १० ते १२ दिवसांचा असतो याची

 प्रमुख लक्षणे ,थंडी वाजून ताप येणे (ताप सततचा किंवा एक दिवसाआड असू शकतो).ताप उतरताना घाम येतो आणि अंग गार पडते. तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होणे.हिवतापाचे खात्रीशीर निदान करण्यासाठी रक्त नमुना तपासणी करणे अनिवार्य आहे. तपासणीनंतर प्रकारानुसार उपचार दिलेजातात.हिवतापाचा प्रकार | उपचार पद्धती

 क्लोरोक्वीन (३ दिवस) + प्रायमाक्वीन (१४ दिवस) ए.सी.टी. गोळ्या (३ दिवस) + दुसऱ्या दिवशी प्रायमाक्वीन मात्र वयोगटानुसार देण्यात येते. ही औषधे उपाशीपोटी देण्यात येऊ नये तसेच गर्भवती माता एक वर्षाखाली बालक आणि जी सिक्स,पी डी ची कमतरता असणाऱ्या लोकांना प्रायमाक्विन देऊ नये. आणि हे औषध उपचार आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली होणे आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डासांची उत्पत्ती रोखणे हाच हिवतापावर खरा उपाय आहे.आठवड्यातून एकदा घरातील हौद, टाक्या, कुलर आणि रांजण रिकामे करून घासून पुसून कोरडे करावेत. घराभोवतीची डबकी, रिकामे टायर, शहाळी आणि नारळाच्या करवंट्या नष्ट कराव्यात.

साचलेली डबकी व नाल्या वाहत्या कराव्यात. जेथे पाणी काढणे शक्य नाही, तिथे आठवड्यातून एकदा रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.ॲबेटींग: पिण्याव्यतिरिक्त इतर साठवलेल्या पाण्यात आरोग्य विभागामार्फत ॲबेटींग केले जाते.डासांच्या अळ्या खाण्यासाठी साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत (हे मासे आरोग्य केंद्रात मोफत मिळतात). संवेदनशील भागात पावसाळ्यात दोनदा फवारणी केली जाते. फवारणीनंतर ३ महिने घर सारवू नये.मेंदूचा हिवताप (Cerebral Malaria)जर प्लासमोडीम फॅल्सीफेरम रुग्णाने वेळेवर किंवा पूर्ण उपचार घेतले नाहीत, तर त्याचे रूपांतर मेंदूच्या हिवतापात होऊ शकते. यात तीव्र ताप, मान ताठ होणे, झटके येणे आणि रुग्ण बेशुद्ध पडणे ही आहेत.अशी लक्षणे दिसताच रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी मच्छरदाणी, पूर्ण कपडे आणि डास प्रतिबंधक क्रीमचा वापर करा.सेप्टिक टँकच्या गॅस पाईपला जाळी बसवा.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणास आणि फवारणी कामात सहकार्य करा.

सतर्कता आणि स्वच्छता हीच हिवताप मुक्तीची गुरुकिल्ली आहे!डॉ. आर. बी. ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

00000

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर शहीदी समागमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात