vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिव्यांग व्यक्तींनी स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींनी स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर,प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या,सहायक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोजगारासाठी ‘बीज भांडवल योजना २०२६-२७’ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत.दि. १० जून २०२६ ते २० जुलै २०२६या दरम्यान अर्ज दाखल करण्याचे आवाहन श्री. बाबासाहेब अरवत, सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, यांनी केले आहे.

अर्ज प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. ही योजना बँकेमार्फत राबवली जाते. बँकेच्या नियमानुसार १.५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून मंजूर कर्जाच्या २०% रक्कम सबसिडी (अनुदान) म्हणून दिली जाते.

 योजनेसाठी दिव्यांग प्रवर्गातील अंध, कर्णबधीर आणि अस्थिव्यंग व्यक्ती अर्ज करू शकतात. मात्र, मतिमंद (बौद्धिक अक्षम) प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना यासाठी अर्ज करता येणार नाही.अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.अर्जदाराने अर्जासोब

 तहसीलदार यांचे मार्च २०२७ पर्यंत वैध असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांनी निर्गमित केलेले अर्ज दाराचे रहिवासी प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र व ठराविक व्यवसायासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’. रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड. ४०% किंवा त्याहून अधिक टक्केवारीचे दिव्यांग (UDID) प्रमाणपत्र. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो. व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल.

 जागेबाबत भाडे पावती, करारनामा किंवा मालकी हक्काचा पुरावा. ही कागदपत्रे आवश्यक आहेत.अर्जदारांनी अर्जातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज ‘दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय’ येथे १० जून २०२६ ते २० जुलै २०२६या दरम्यान दाखल करावाछत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधव-भगिनींनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बाबासाहेब अरवत, सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण…

कोपरखैरणे विभागात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नगरसेवकांसह केली पाणी नमुने तपासणी*

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

हवामान विभागाचा इशारा! उत्तर भारतासह विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता …

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

नगरपरिषद – नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 दुसऱ्या दिवशी सदस्य पदासाठी 3 नामनिर्देशनपत्रे दाखल..

vishwatmaklokswamivarta