vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि अराजकतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर मुंबईकरांची वज्रमूठ; बोरिवलीत ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेला हजारो राष्ट्रप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद!” 🇮🇳⚡

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि अराजकतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर मुंबईकरांची वज्रमूठ; बोरिवलीत ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेला हजारो राष्ट्रप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद!” 🇮🇳⚡

मुंबई प्रतिनिधी-देशाची प्रगती, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि राष्ट्राची एकात्मता अबाधित राखण्यासाठी कणखर नेतृत्व आणि जागरूक नागरिकांची अभेद्य एकजूट हीच खरी ताकद आहे!प्रारंभ: स्वामी विवेकानंद स्मारक, बोरिवली (पश्चिम)🎯 समारोप: सप्ताह मैदान, महावीर नगर (कमला विहार स्पोर्ट्स क्लब समोर)

 पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ घडवण्याच्या संकल्पाला अधिक बळ देण्यासाठी आज बोरिवलीच्या पावन भूमीवर राष्ट्रभक्त जनशक्तीचा भव्य जागर घडला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबईचे लाडके खासदार मा. श्री. पीयूषजी गोयल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रा हजारो देशभक्त नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ऐतिहासिक ठरली!

स्वामी विवेकानंद स्मारक (बोरिवली पश्चिम) येथून सुरू झालेली ही पदयात्रा सप्ताह मैदान, महावीर नगर येथे संपन्न झाली. संपूर्ण मार्गावर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. लोकशाही मूल्यांचे जतन करणे, सामाजिक शांतता अबाधित राखणे आणि अराजक प्रवृत्तींना रोखून विकासाची गती कायम ठेवणे, हाच ठाम संदेश या पदयात्रेने संपूर्ण देशाला दिला आहे.

या भव्य पदयात्रेत केंद्रीय मंत्री मा. श्री. पीयूषजी गोयल यांच्या नेतृत्वात मी स्वतः, आमदार श्री. योगेश सागर, आमदार श्री. अतुल भातखळकर, आमदार श्री. संजय उपाध्याय, विधानपरिषद गटनेते आमदार श्री. प्रवीण दरेकर, आमदार श्री. प्रकाश सुर्वे, मुंबई महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर, जिल्हाध्यक्ष श्री. दीपक तावडे यांच्यासह उत्तर मुंबईतील महायुतीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो सजग नागरिक, माता-भगिनी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशाहीवरील अढळ विश्वास, राष्ट्रहिताची बांधिलकी आणि विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करत आपण सर्वजण एकत्र वाटचाल करत राहू! 🇮🇳🚩✊

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी-

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा – मंत्री पंकजा मुंडे महा पशुधन एक्स्पो २०२६ चे परळीत उद्घाटन, ३८ एकर क्षेत्रात विविध स्टॉलची मांडणी

vishwatmaklokswamivarta

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम वाळू प्रकल्पांना सवलती देऊन प्रोत्साहन*जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मितीला चालना*जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

vishwatmaklokswamivarta