vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

*“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

नांदेड प्रतिनिधी :- श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे सन २०२५-२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास, धर्मासाठी दिलेले महान बलिदान तसेच समाजासाठी केलेले अमूल्य कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने नांदेड येथे ऐतिहासिक, भव्य व दिव्य “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड येथे असर्जन भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.मुख्यमंत्री महोदय विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहेत.*शैक्षणिक उपक्रम*या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये खालील शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जनजागृती मोहीम १५ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान प्रभातफेरीचे आयोजन. २५ जानेवारी २०२६ पर्यंत शाळांमधील परिपाठाच्यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित,डॉक्युमेंटरी प्रदर्शन, घोषवाक्याचा प्रसार : “हिंद दी चादर- श्री गुरु तेग बहादुर”

*तालुकास्तरीय स्पर्धा* (१५ ते १७ जानेवारी २०२६)चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ई.*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*दिनांक : २० जानेवारी २०२६ठिकाण : गुरुग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूलजवळ हिंगोली गेट, नांदेडविद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.

*नागरिकांसाठी आवाहन*नागरिकांनी सोशल मीडियावर #hinddichadar350 या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट शेअर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासंबंधी सविस्तर माहिती gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

संबंधित पोस्ट

एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’

vishwatmaklokswamivarta

भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

♦️ बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..