vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

 

नांदेड, प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या #अवैधवाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धडक कारवाई करत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रविवार ११ जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील मौजे येळी येथे नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या वेळी नदीपात्रात अवैध उत्खनन सुरू असताना ३ हायवा ट्रक, ७ जेसीबी, १ मोठी फायबर बोट व ४ तराफे आढळून आले. तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना घटनास्थळी बोलावून अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ४५ ब्रास वाळूचा साठा देखील जप्त करण्यात आला असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ कोटी ३२ लाख रुपये इतकी आहे

जप्त केलेला सर्व मुद्देमाल तहसील कार्यालय, लोहा येथे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर निश्चितच आळा बसण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

००००००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी13 रूग्णालयांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव- जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta

शोक संवेदना**भारतीय सांगीतिक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड*-पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई*पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून शोक संवेदना*

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन