vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात..

मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात..

 

     अमरावती, प्रतिनिधी: अमरावती येथे कार्यरत देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या पहिल्या परीक्षेस सोमवार, दि. 19 जानेवारीपासून सुरूवात झाली आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या या पहिल्याच परीक्षा असल्याने विद्यार्थी आणि व्यवस्थापनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    पहिलेच वर्ष असल्याने विद्यापीठाने चार अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यात कला स्नातक (बी.ए.) भाषा व लिपीशास्त्र, प्रादर्शिक कला स्नातक (बी.पी.ए. नाटक), स्नातकोत्तर मराठी (अभिजात भाषा) आणि स्नातकोत्तर मानसशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापिठाचे पहिलेच वर्ष असतानाही 49 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. अभ्यागत प्राध्यापकांच्या सहकार्याने प्रथम सत्राचे वर्ग सुरू करण्यात आले. कालपासून या सर्व चार अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली आहे. याचा विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठाचा प्रारंभ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक होती, परंतु विद्यापीठ व्यवस्थापनाने तज्ज्ञ अभ्यागत प्राध्यापकांना निमंत्रित करून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थीवर्ग सुखावला असून विद्यापीठाबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे.

    अनेक अडचणी असतानाही विद्यापीठाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच या चार अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली. विद्यार्थ्यांनी उत्तम प्रवेशास प्रतिसाद दिला. अभ्यासकांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची मांडणी केली असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकाळात या अभ्यासक्रमांचा निश्चितच उपयोग होणार आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी नवे अभ्यासक्रम विद्यापीठ सुरू करणार असल्याचे विद्यापीठाच्या कला व साहित्य प्रशालेचे अधिष्ठाता व प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. कोमल ठाकरे यांनी सांगितले.

 

00000

संबंधित पोस्ट

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन;• पुनर्वसनाला प्राधान्य देत २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

शिक्षणाच्या खासगीकरणावर भर : आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,यंदा दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश· कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

किलीमांजारो शिखर सर करुननिखिल कोकाटे यांची ऐतिहासिक कामगिरी· आदिवासी विकास विभागाचे पाठबळ· पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहकाचा मान…

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक