vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड जिल्ह्यात #पेट्रोल , #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड जिल्ह्यात #पेट्रोल , #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

राज्य प्रतिनिधी

 नांदेड शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती व गोंधळ निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र नांदेड शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा आणि नियमितपणे पुरवठा होत आहे. अचानकपणे डिझेलच्या मागणीत 25-30 टक्के वाढ झाल्याने, पॅनीक खरेदी होत असल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा स्पष्ट खुलासा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केला आहे

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, #इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणेमार्फत यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गुरूवार 21 मे 2026 रोजीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 1 हजार 951 केएल (KL) पेट्रोल आणि 2 हजार 79 केएल (KL) डिझेलचा साठा उपलब्ध आहे.

नागरिकांना आवाहन व #सूचना* कोणत्याही अप्रमाणित अफवा, सोशल मीडियावरील चुकीचे संदेश किंवा माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. * भीतीपोटी किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल / डिझेल खरेदी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न करू नये.* पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.* अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून, अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.* नागरिकांना कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.

#तक्रारनिवारण संपर्क व्यवस्थाजिल्ह्यातील नागरिकांना पेट्रोल / डिझेलबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा* व्हॉट्सअॅप चॅट बॉट सेवा ( WhatsApp Chat Bot) : 866822332* ई-मेल आयडी : dsonanded1@gmail.com.तालुकास्तरावरील #संपर्कक्रमांक

नांदेड- 7030773040, अर्धापूर- 8805068954, मुखेड- 9356806405, धर्माबाद- 9421841447, मुदखेड- 9445112782, उमरी- 8805447837, बिलोली- 9637963222, लोहा- 9356806405, हिमायतनगर- 8308073089, हदगाव- 8805068954, कंधार- 9823757345, माहूर – 9403184473, किनवट- 9850296096, भोकर- 8421183602, देगलूर- 9423805064, नायगाव- 7057002865 याप्रमाणे आहेत.नागरिकांनी शांतता, संयम व सहकार्य राखावे. सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन समस्येविषयी आढावा बैठकीत त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, तेल कंपनीचे विक्री अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

00000

 

Maharashtra DGIPR विभागीय माहिती कार्यालय, लातूर DDSahyadri Doordarshan National (DD1)

संबंधित पोस्ट

पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण..

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणाआदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार· ५० लाख कुटुंबांना लाभ

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती! हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्य भोर तालुक्यातील नसरापूर तील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार  हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा….

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली